
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते प्रतिकात्मक आरंभ करण्यात आलेल्या, राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने प्रादेशिक परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पिक्सेलस्टेट यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ‘रस्ता सुरक्षा लघुपट’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ.
Winning Movies
WINNER
Movie Title : CiAO
Message From Movie :
स्पर्धे बद्दल कळल्यावर सादरीकरणासाठी दिलेले विषय आम्ही वाचले. त्यामध्ये गोल्डन hour हा विषय वेगळा वाटला, कारण गोल्डन hour म्हणजे नेमकं काय हे माहीत नव्हत.
म्हणून त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वर जाऊन त्या विषयाबद्दल माहिती घेतली. आणि ते वाचल्यावर त्या विषयाचं गांभीर्य लक्षात आलं. आमच्या प्रमाणेच बहुतांशी लोकांना हा विषय आणि ह्याचे गांभीर्यच माहीत नसावं, त्यामुळे स्पर्धे बरोबरच हा विषय शक्य तितक्या सोप्या आणि परिणामकारक रित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावा, ह्या हेतूने आम्ही हा विषय nivadyanche ठरवले. अपघात जरी अनपेक्षित रित्या घडत असेल तरीही आपण अपेक्षित प्रथमोपचाराची तयारी ठेवणं किती गरजेचं आहे, आणि ते योग्य रित्या साधल्यास किती परिणामकारक ठरू शकतं, हे लोकांपर्यंत pohchna खूप गरजेचं वाटलं. आणि त्या करिता तितकीच संवेदनशील कथानक मांडला जाणार गरजेचं होतं. ह्याच प्रेरणेतून आम्हाला ही कल्पना सुचली. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी मी स्वतः एका रस्ता अपघातामध्ये आमचा एक मित्र कायमचा गमावला. गोल्डन hour च्या link wr नमूद केलेल्या गोष्टी काही वर्षं अगोदर माहीत अस्त्या तर त्याचा थोडाफार तरी उपयोग त्या क्षणी करता आलं असता. हीच वेळ आणखी कोणावर येऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, याच आम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वरूप म्हणून आम्ही हा लघुपट करण्याचे ठरवले.
Read more
Producer / Actor /Actores : Satvik Welaskar
RUNNER-UP
Movie Title : Aarasa – The Mirror
Message From Movie :
आपल्याला बऱ्याचदा आपले अधिकार लक्ष्यात असतात पण आपल्या कर्तव्यांकडे आपण काणा डोळा करतो बरेच दिवस अश्याच एका विषयावर काही तरी बनवावं असं वाटत होतं.
वाहतूक आणि वाहतूकीचे नियम हा आजच्या युगातला प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्या घटक झाला आहे आणि वाहतुकीचे नियम खूप शुल्लक आहेत म्हणून आपण खूप सहज ते मोडत असतो कारण दुसरा व्यक्ती ते सहज मोडतो. या लघुपटात अशीच पात्रं मी केली कि जी आपल्याला आपल्या जवळची वाटतील.मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत बोलत असताना असे बरेच अनुभव आपण ऐकत असतो, दुसऱ्याकडे बोट दाखवताना बाकी 3 बोटं आपल्याकडे असतात हे आपण विसरून जातो. रोजच्या व्यवहारातून जे वाहतूकीच्या नियमांबद्दलचे इतर लोकांचे अनुभव, विचार आले, येतात तेच मी या लघुपटात मांडायचा प्रयत्न केला आहे.
Read more
Producer / Actor /Actress : Aniket Bajarang Wagh, Vasudev Shirish Dharmavat
RUNNER-UP Second
Movie Title : The CROSSOVER
Message From Movie :
हि माझी पहिली शॉर्ट फिल्म आहे, मी आणि माझे काही कॉलेज च्या मित्रांनी मिळून बनवली होती,
आजच्या काळातील सर्वात मोठी अडचण किंवा फ्याड म्हणजे आधुनिकता( मोबाईल), ह्या मुळे जग खरं जगणं पूर्णतः कस विसरून गेले आहे, हा ह्या फिल्म चा मूळ विषय होता, आणि ह्या जगाला पुन्हा खरं जगणं जर का जगायचं तर त्या लहान मुलाची म्हणजेच, बालपण सारख्या मोकळ्या श्वासाची गरज आहे, आणि जर का तो हि हरवला तर? हा ह्या फिल्म बनवण्या पाठीचा संदेश होता.
Read more
Producer / Actor /Actress : Abhijeet Kanade, Sourabh Dharmshale, Kaif, Nabil Shaikh,
SPECIAL MENTION
Movie Title : Sign Language
Producer / Actor /Actress : Vinay Javalgikar, Sunil Sutar, Nileema Pathak, Aditi Joshi, Rupali Javalgikar
BEST PRODUCTION HOUSE
Movie Title : TRAFFIC RULES
Message From Movie :
Day by day using of mobile is increasing in
the public, almost everyone is using social media and they have their accounts of all social sites like Whatsup’s, Facebook Instagram etc.
There is very much curiosity to check the status and notifications updates of their post. Almost drivers are using this applications while they are driving their vehicles which is very dangerous. If the driver
is not aware for two seconds and he ignores the traffic rules an accident can happened and in that accident he may be lose his life or take others life also who are not responsible for the accident. Or the results of the accident turns into handicapped them for life long. Here we try to give this message by the short movie “TRAFFIC RULES” RTO MAHARASHTRA STATE & AKHIL
BHARTIYA MAHARASHTRA CHITRAPAT MAHAMANDAL gave this chance to project this movie in the large scale. They gave us two AWARDS also for this ( Best Productions & Best Cinematography )Thanks a lot for appreciations from the ORGANISERS’ Hope viewers will see this
movie and learn the disadvantages of using mobile while driving.
Read more
Producer / Actor /Actress : MANOJ PITADI, SHAILESH N ANIKHINDI, DR ANURADHA, DAYANAND SHETTY KAUSHIK SHARMA
BEST PRODUCTION INDIVIDUAL PRO
Movie Title : What the helmet?
Message From Movie :
मागील वर्षी पुण्यात हेल्मेट सक्ति केली होती. त्यामुळे विनाहेल्मेट गाडी चालवायची सोयच नव्हती. पण तरीही बरेच अपवाद होतेच त्यातील एक माझा मित्र.
काहीही झाल तरी हेल्मेट नाही घालायचं, हे त्याच ठरलेल. त्याला विचारता तो म्हणे “सेफ्टी वैगेरे ठीके रे,पण हेयरस्टायल बिघडते त्याच काय?” १० लोकं तोंडाकडे बघत असतात आपल्या; त्यामुळे का म्हणून हेयरस्टायलची वाट लावायची? आणि याच घटनेतून मला “व्हाट द हेल्मेट” ची कल्पना सुचाली. देशपातळीरील गंभीर विषय, सहसा ज्याकडे दुर्लक्ष केल्या जात. तो म्हणजे दुर्घटना, हा विनोदी शैलीने हताळन्याचा आम्ही प्रयत्न केलाय.
Read more
Producer / Actor /Actress : Shubham pandav, Prasad gayki
, Shivani dorage, Rushabh rathod, Sushant divakar, Rituraj howal
BEST PRODUCTION MOBILE
Movie Title : Pudhe ChauRasta Ahe
Message From Movie :
विषय व त्याचा अभ्यास एक चिंतनच आहे तसेच ‘पुढे चौ रस्ता आहे’ हा विषय वाचनात साधा वाटत असेल पण तितकाच गंभीर आहे.
या लघुपटाच्या माध्यमातून वाहनांची रहदारी व त्यात होत असलेले नियमांचे उल्लंघन हे प्रदर्शित करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. शहर असो की ग्रामीण भाग नियमांचा सर्रास फज्जा उडविला जातो. यात तरुणाचा टक्का जास्त आहे व नियमांचे उल्लंघन होत असतांना कित्येक तरुण आपला जीव गमावून बसतात, आंशिक किंवा पूर्ण:त अपंगत्व येतं. म्हणून या लघुपटाद्वारे रस्त्यावर गाडी चालविताना नियमांचा काटेकोर पणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे असे दाखविण्यात आले आहे.
Read more
Producer / Actor /Actress : Akash Jumde & Vipul Chaudhari, Faiz Khan, Kamla Bai Patil, Vijay Kumar Bhakte & Prashant Khalokar,
BEST MESSAGE
Movie Title : STATUS
Message From Movie :
सामाजिक जबाबदारीची जाणिव व लोकांना कायद्याचं महत्व पटवून देणे आम्हाला गरजेचे वाटले ज्यातून वाहतूकी सारखी गंभीर समस्या सोडविण्यास थोडी मदत होईल असे वाटले.म्हणून ही निर्मिती.
Producer / Actor /Actress : Jayesh Sanghavi, Abhijeet choudhary, Nil, Shailendra Nirmale
JURY AWARD
Movie Title : It Matters…!
Message From Movie :
सध्याच्या युगात जीवनशैलीची गतिमानता वाढत आहे. या टी-२०च्या जमान्यात कमीत कमी वेळात एखाद्या विषयावरील आपली भूमिका मांडण्याला महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते.
लघुपट हे यादृष्टीने अतिशय प्रभावी माध्यम वाटते. ‘रस्ता सुरक्षा’ हा आपल्या दैनंदिन जीवनातील जवळचा व अविभाज्य भाग आहे, ज्याचा जन्म आणि मृत्यूवर थेट फरक पडतो. म्हणूनच या विषयाकडे गांभीर्याने बघावेसे वाटले. केवळ ५०-६० सेकंदाचा हा लघुपट रहदारीचा रस्ता ओलांडू पाहणारे आजोबा आणि वाहनाने कामावर निघालेला युवक यांच्यातील प्रसंगावर आधारलेला आहे. रस्ता सुरक्षा व सामाजिक भान या दोन विषयांची सांगड घालण्याचा प्रयत्न सदर लघुपटात केला गेला आहे. व्यक्ती-व्यक्तींचा मिळून समाज बनतो, म्हणूनच सामाजिक परिवर्तनाचा पाया वैयक्तिक जाणिवा समृद्ध झाल्याने रचला जातो, या मूलभूत विचाराने या लघुपटाचा उदय झाला. हा लघुपट पाहताना जर मनोरंजनासोबतच प्रेक्षकांमध्ये संवेदनशीलतादेखील जागृत झाली, तर ते या लघुपटाचे यश असेल. वैयक्तिक स्तरावरूनच संवेदनशीलता जोपासली जावी, कारण – ‘It Matters…’!!
Read more
Producer / Actor /Actress : Nachiket kolapkar, Hrishikesh Borkar, gandharva gulwelkar, Jayant Pathak , Parth Waikar, Abhiraj salve.
SOCIAL MEDIA MOST LIKES
Movie Title : Madat Mama
Producer / Actor /Actress : Hanuman Talim Mandal, Kalammawadi, Snehal Sankpal, Suresh V. Patil, Prakash Patil & Sunil Mane, Sunil Mane, Shekhar Gurav.
SOCIAL MEDIA MOST VIEWER
Movie Title : Purnviram
Producer / Actor /Actress : Akash Bokmurkar & Deva B Avhad, Malhar Sanjay Joshi, Amit Kamble, Vaishali Ghorpade, Akash Bokmurkar, Deva B Avhad.
BEST DIRECTOR
CiAO
BEST WRITER
Aarasa – The Mirror
BEST ACTOR
Aarasa – The Mirror
BEST ACTRESS
CiAO
BEST CHILD ARTIST
CiAO
BEST DOP
TRAFFIC RULES
BEST EDITOR
The CROSSOVER